भुसावळ ते दादर आणि साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ ;

 भुसावळ (प्रतिनिधी) - रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सोय लक्षात घेऊन  भुसावळ ते दादर आणि साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) भुसावळ ते दादर साप्ताहिक विशेष ( १६ फेरी) 
गाडी क्रमांक 09050 भुसावळ ते दादर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दि ३१.०७.२०२६ पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि २५.०९.२०२६  पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09049 दादर ते भुसावळ साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दि ३१.०७.२०२६ पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि २५.०९.२०२६  पर्यंत करण्यात आला आहे.

२) साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष ( ०४ फेरी) 
गाडी क्रमांक 04716 साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष गाडीचा संचालन कालावधी दि ०९.०८.२०२६ आणि १६.०८.२०२६ पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 04715 बिकानेर ते साई नगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडीचा संचालन कालावधी दि ०८.०८.२०२६ आणि १५.०८.२०२६ पर्यंत करण्यात आला आहे.

वरील विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये व रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आरक्षण:- विशेष गाडी क्रमांक 04716 साठी आरक्षण दिनांक ०७.०८.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या (http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन अॅप देखील डाउनलोड करू शकतात. संबंधित विशेष गाड्यांच्या थांब्यांबाबत सविस्तर वेळापत्रकासाठी (http://www.enquiry.indianrail.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.