ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न:


भुसावळ (प्रतिनिधी) - येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सत्र २०२६/२७ साठी नवीन विद्यार्थी परिषदच्या गठनासाठी भव्य पदग्रहण समारोह दि ५ रोजी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्कुलच्या प्रिंसिपल निना कटलर उपस्थित होते. 
प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन तसेच द्वीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.  
त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना बॅच लावून शाळेची मर्यादा राखण्याची व आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ देण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी कॉन्टिन्जेंट लीडर: सोफिया पीबॉडी,हेड बॉय शौर्य देशमुख,हेड गर्ल कनिष्का खंडारे,असिस्टंट हेड बॉय वेदांत सरोदे,असिस्टंट हेड गर्ल बुशरा सैय्यद,हाऊस लीडर्स रेड हाऊस गायत्री घिर्णीकर,येलो हाऊस पंकज राठोड,ग्रीन हाऊस,मनीषा किरंगे,ब्लू हाऊस सोनाली शिवरामे तर विभाग प्रमुख सांस्कृतिक, क्रीडा,शिस्त,शैक्षणि,योगा,चित्रकला,आरोग्य व स्वच्छता राजदूत म्हणून प्रभारी शिक्षक प्रीती बुटी,शोएब शाह यांची बॅच देऊन नियुक्ती करण्यात आली.

 प्रमुख पाहुणे पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त,देशभक्ती व चांगला नागरिक बनण्याचे गुण यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना व विद्याथ्यांना शुभेच्छा दिल्या.

तर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी,कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा यांनी देखिल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया रायन व सोफिया पीबॉडी यांनी केले.तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.

फोटो कॅप्शन - ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये पदग्रहण सोहळा प्रसंगी पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले व प्रिन्सिपल निना कटलर
यांच्या सोबत डावीकडून बुशरा सय्यद,कनिष्का खंडारे,शोर्य देशमुख,वेदांत सरोदे,सोफिया पीबॉडी आदी दिसत आहे.