भुसावळ रेल्वेतील दोन अनुभवी मुख्य तिकीट निरीक्षकांचा गौरवपूर्ण निरोप; शेखर गोटले व सुरेश आडे सेवानिवृत्तश्री कृष्णचंद्र सभागृहात दिमाखदार समारंभ; ३८ व ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेला मान्यवरांकडून सलाम

भुसावळ (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक शेखर शंकर गोटले आणि सुरेश रामचंद्र आडे हे नुकतेच रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि गौरवशाली सेवेला सलाम करण्यासाठी रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र सभागृहात १ ऑगस्ट रोजी दिमाखदार निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शेखर गोटले यांनी रेल्वे विभागात तब्बल ३८ वर्षे, तर सुरेश आडे यांनी ३२ वर्षे अविरत आणि निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि कार्यक्षमतेचा रेल्वे प्रशासनाला मोठा लाभ झाला. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघांचा यथोचित सन्मान करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिव्हिजनल चीफ तिकीट निरीक्षक एस. पी. कांबळे, सीटीआय चेक बी. आर. भगत आणि आयआरटीसीएसओचे अध्यक्ष धीरज कुमार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचारीवर्गातर्फे दोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गोटले आणि आडे यांच्या रेल्वे सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दोघांच्या मित्रमंडळींनीही रेल्वे सेवेदरम्यानच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे हा निरोप समारंभ कौटुंबिक आणि भावनिक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी तिकीट तपासणी कर्मचारीवर्गातील बापू पाटील, भवानीशंकर, के. सी. तायडे, एस. के. सलीम, बी. पी. सिंग, सत्यजीत माधवान, लीलाधर पाटील, निसार खान, एस. के. इम्रान, शेख सलीम, अभिषेक नामदेव, तसेच सेवानिवृत्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एन. जी. बोरीकर यांच्यासह रेल्वेचे अनेक कर्मचारी, दोन्ही अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - भुसावळ येथील रेल्वे चे मुख्य तिकीट निरीक्षक शेखर गोटले व सुरेश आडे यांना दोघींना सेवा निवृत्ती निमीत्त निरोप देतांना भुसावळातील चेकिंग स्टॉप चे बापू पाटील,भवानी शंकर, के.सी.तायडे,एस के सलीम,बी पी सिंग, सत्यजीत माधवान, लीलाधर पाटील,निसार खान,एस के इम्रान,शेख सलीम,अभिषेक नामदेव आदी ....