१०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या १९ बीएलओंचा उद्या सपत्नीक सत्कार : भुसावळातील संतोषी माता हॉलमध्ये मंत्री महोदयांच्या हस्ते होणार गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) - मतदार यादीच्या कामात १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या १९ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) उद्या, बुधवार दि. २२ जुलै २०२६ रोजी सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून, मा. मंत्री महोदयांच्या हस्ते या बीएलओंचा गौरव करण्यात येणार आहे.

या सत्कारासाठी १०० टक्के काम पूर्ण केलेल्या १९ बीएलओंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये जोगलखेडा, प्रिपीसेकम, कठोरे बु., सावतर निंभोरा, मानपूर, साकरी, किन्ही, मिरगव्हाण, गोंभी, वराडसीम, जोगलखोरी, कु-हे प्र. न., भिलमळी, शिंदी आणि सुसरी या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सत्कारासाठी निवड झालेल्या सर्व बीएलओंनी उद्या सकाळी ठीक ११ वाजता संतोषी माता हॉल, भुसावळ येथे सपत्नीक उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सत्कारासाठी निवड झालेले बीएलओ :
  जितेंद्र देविदास झांबरे — जोगलखेडा,  श्रीमती लिना सुरेश अहिरे — प्रिपीसेकम,  धर्मराज पाटील — कठोरे बु., . संजय पांडुरंग पाटील — सावतर निंभोरा, श्रीमती ज्योती नंदलाल बेलसरे — मानपूर, . विजेंद्र पंढरी नेहेते — साकरी, ) श्री. सचिन गोपाळ नेहेते — साकरी, 
. ओंकार एकनाथ पाटील — किन्ही, 
  गिरीष ज्ञानदेव चौधरी — किन्ही, 
. रुपेश सुनील नेहेते — किन्ही, 
 श्रीमती सपना सुभाष राणे — मिरगव्हाण, 
 श्रीमती पौर्णिमा रमेश नेमाडे — गोंभी, 
. प्रमोद दिलीप नारखेडे — वराडसीम,
 दीपक प्रल्हाद पाटील — जोगलखोरी, 
 . निलेश माणिकराव पाटील — कु-हे प्र. न., 
 श्रीमती वृकवल्ली मनोहर भगत — भिलमळी, 
 . विजय पांडुरंग नेहते — शिंदी, श्रीमती विद्या शांताराम पाटील — सुसरी, 
 . अजय दिलीप नेहेते — साक्री, यांचा समावेश आहे.