भुसावळातील दिगंबर जैन मंदिरात अष्टान्हिका पर्वानिमित्त २१ ते २९ जुलैदरम्यान सिद्धचक्र विधान सोहळ्याचे आयोजन

दररोज अभिषेक, शांतिधारा, सिद्धचक्र विधान; २९ जुलै रोजी होम-हवन व सामूहिक सहभोजन; 
भुसावळ(प्रतिनिधी )- भुसावळ येथील श्री दिगंबर जैन मंदिर संस्थेतर्फे अष्टान्हिका पर्वानिमित्त दि. २१ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.०० ते ११.०० या वेळेत सिद्धचक्र विधान या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी ७.०० वाजता श्रीजींचा अभिषेक व शांतिधारा, त्यानंतर सकाळी ७.३० ते ११.०० या वेळेत सिद्धचक्र विधान होणार आहे.

या धार्मिक सोहळ्याची सांगता दि. २९ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सामूहिक सहभोजनाने होईल. तसेच अंतिम दिवशी श्रीजींचा अभिषेक, शांतिधारा, सिद्धचक्र विधान तसेच होम-हवन आयोजित करण्यात आले आहे.

या निमित्ताने भाविकांनी अभिषेक, शांतिधारा, विधान व होम-हवनमध्ये सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थेतर्फे करण्यात आले आहे. इच्छुकांनी पुढीलप्रमाणे नावनोंदणी करता येणार आहे.

- अभिषेक (चांदीच्या कलशातून) – ₹३००
- शांतिधारा (चांदीच्या कलशातून) – ₹६००
- सिद्धचक्र विधान – ₹६००
- होम-हवन (२९ जुलै) – ₹३००

भाविकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन श्री दिगंबर जैन मंदिर संस्था, भुसावळतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमासंदर्भातील अधिक माहितीसाठी ८८६२००५५३८, ७७९६५२२५९५, ८००७०८४०९० आणि ९९२३१६९८९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.