उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातील बरेली यार्ड येथे वॉशिंग लाईनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनस ते बरेली एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहेत. तपशील पुढीलप्रमाणे : गाडी क्रमांक १४३१३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते बरेली एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २०.०७.२०२६ ते ०३.०८.२०२६ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रद्द. गाडी क्रमांक १४३१४ बरेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवास सुरू दिनांक १८.०७.२०२६ ते ०१.०८.२०२६ पर्यंत बरेली येथून रद्द. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करावा.


