मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी संतोष शेलोडे यांची निवड:

भुसावळ प्रतिनिधी
  मराठी पत्रकार संघाच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी भुसावळ येथील पत्रकार  संतोष खंडू शेलोडे यांनी निवड करण्यात आली आहे .
मुंबई येथील ९ जुन रोजी संपन्न झालेल्या  मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शेलोडे यांना  प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश सचिव हरीभाऊ प्रक्षाळे,  प्रदेश संघटक संदीप पारोळेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
या अधिवेशनात राज्यपाल जिष्णू देव , राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,स्वामी गौर गोपाल दास आदी मान्यवर  उपस्थित होते . संतोष शेलोडे यांच्या पत्रकारीतेचा अनुभव व कार्य क्षमता याबाबत विचार करून त्यांची निवड करण्यात आली आहे .
अधिवेशनासाठी महाराष्ट्र भरातून प्रतिनिधी उपस्थित होते . भुसावळहून पत्रकार   कमलेश चौधरी, श्याम गोविंदा, वसंत कोलते,विनोद गोरधे, किशोर सावळे यांनीही कार्यक्रमा साठी उपस्थिती दिली . पत्रकारांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच पत्रकारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे यावेळी संतोष शेलोडे यांनी सांगितले .