मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्डमध्ये डीसीएन (DCN) कार्यासाठी विशेष ब्लॉक


मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्ड येथे विद्यमान रेल्वे संरचनेतील डीडीएस (DDS) पॉइंट क्रमांक २०८/२०९ बदलण्यासाठी तसेच यार्डमधील सिग्नल व पॉइंट व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी डीसीएन अंतर्गत महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी व सिग्नलिंग काम हाती घेण्यात येणार आहे. या कार्यासाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी काही गाड्याच्या परिचालनावर परिणाम होणार आहेत ते पुढीलप्रमाणे -
गाडयांचे रद्दीकरण - 
१) गाडी क्रमांक १२१३५ पुणे ते नागपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०६.२०२६ रोजी पुणे येथून रद्द .  
२) गाडी क्रमांक १२१३६ नागपूर ते पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०६.२०२६ रोजी नागपूर येथून रद्द .  

शॉर्ट टर्मिनेशन - 
१) गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी - पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२६ रोजी जम्मूतवी येथून सुटणारी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर ते पुणे दरम्यान रद्द राहील.
२) गाडी क्रमांक ११४०६ अमरावती - पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०६.२०२६ रोजी अमरावती येथून सुटणारी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर ते पुणे दरम्यान रद्द राहील.

गाड्याचे पुनः निर्धारण - 
१) गाडी क्रमांक २२१७१ पुणे - रानी कमलापती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०६.२०२६ रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल (नियोजित वेळ १५.१५ वाजता).

हे ब्लॉक रेल्वे पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी तसेच सुरक्षित रेल्वे संचालनासाठी अत्यावश्यक आहेत. या कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.