रेल्वे प्रशासनाने हुबळी आणि योग नगरी ऋषिकेश दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचे नियमित रेल्वे सेवेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित एक्सप्रेस गाड्या म्हणून चालविण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह आणि नियमित सेवा उपलब्ध होईल. सध्या चालू असलेली गाडी क्रमांक 07363/07364 हुबळी – योग नगरी ऋषिकेश विशेष रेल्वेगाडीचे खालीलप्रमाणे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे –

- गाडी क्रमांक 17363 हुबळी – योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस (साप्ताहिक) दिनांक 06.07.2026 पासून प्रत्येक सोमवारी हुबळी येथून सुटेल.
- गाडी क्रमांक 17364 योग नगरी ऋषिकेश – हुबळी एक्सप्रेस (साप्ताहिक) दिनांक 09.07.2026 पासून प्रत्येक गुरुवारी योग नगरी ऋषिकेश येथून सुटेल.
नियमित रेल्वे सेवांचे वेळापत्रक
- गाडी क्रमांक 17363 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 06.07.2026 पासून प्रत्येक सोमवारी हुबळी येथून 19.45 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी योग नगरी ऋषिकेश येथे 23.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 17364 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 09.07.2026 पासून प्रत्येक गुरुवारी योग नगरी ऋषिकेश येथून 06.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हुबळी येथे 06.30 वाजता पोहोचेल.
थांबे – धारवाड, लोंडा, बेळगाव, घाटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ सिटी, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुडकी आणि हरिद्वार.
रचना – 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 3 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 6 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 सामान व गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार.
प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne अॅप डाउनलोड करू शकतात.
या रेल्वेगाड्यांच्या थांब्यां व वेळापत्रकाची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी कृपया भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


