भुसावळ (प्रतिनिधी) – येथील नाहाटा महाविद्यालयाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,यात बालाजी गल्ली,गांधी चौक परिसरातील अरिहंत किराणाचे माजी संचालक नेमीचंद जैन यांचा मुलगा आयुष जैन याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.आयुषने वाणिज्य शाखेत ९३.३३% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
आयुषच्या या घवघवीत यशामुळे जैन समाज बांधवांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी समाज बांधवांनी आयुषला मिठाई भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी जयंतीलाल सुराणा,जे. बी.कोटेचा,कांतीलाल चोरडिया,गौतम चोरडिया,विशाल चोरडिया,विनोद मेहता,विजय चोरडिया,शिरीष नाहाटा,पप्पू नहार आणि आय.जी.नहार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.आयुषच्या या यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

फोटो कॅप्शन – जैन बांधवांतर्फे आयुष चा सत्कार प्रसंगी जयंतीलाल सुराणा,जे.बी. कोटेचा,कांतीलाल चोरडिया,गौतम चोरडिया,विशाल चोरडिया,विनोद मेहता,विजय चोरडिया,शिरीष नाहाटा,पप्पू नहार,आय.जी.नहार आदी.


