मेस्को सुरक्षा कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश

भुसावळ(प्रतिनिधी ) – २८येथील बी.टी.पी.एस. दीपनगरमधील महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाअंतर्गत कार्यरत मेस्को सुरक्षा कामगारांच्या वेतनातील तफावतीचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे २८ तारखेला मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मंत्री शंभूराज देसाई आणि संजय सावकारे यांनी भूषवले.
बैठकीदरम्यान कामगारांच्या वेतनातील तफावत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी कामगारांच्या समस्यांची मांडणी केली. यावर मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले. तसेच, दीपनगर येथील कामगारांच्या सर्व प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
, या बैठकीत कामगारांच्या वेतन तफावतीचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली गेली असून, लवकरच त्यावर ठोस कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.