महिला सफाई कामगारांचा सन्मान ; नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम:


भुसावळ (प्रतिनिधी )- नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज १ मे महाराष्ट्र दिन अर्थातच कामगार दिनानिमित्त जळगाव महानगरपालिकेच्या सफाई महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. समाजात काही व्यक्ती अशा असतात की त्या आपलं काम सेवेने करत असतात त्या कामाचा कुठेही उदो उदो होत नाही. कोणत्याही क्षेत्रात मागे नसलेल्या, कोणतेही कठीण काम करण्यासाठी सशक्त व कणखर असलेल्याअशाच सफाई महिला भगिनींचा सन्मान कामगार दिनाच्या औचित्याने आज शांताबाई बाबुराव पाटील सभागृह व्यंकटेश कॉलनी येथे संपन्न झाला. यात जवळजवळ जळगाव महानगरपालिकेच्या 30 सफाई महिला भगिनींचा सन्मान नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सौ मनीषा पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते गुलाब पुष्प व रुमाल देऊन करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन आशा मौर्य आभार वंदना मंडावरे यांनी मानले..
यावेळी नूतन तासखेडकर रेणुका हिंगू माधुरी शिंपी किमया पाटील हर्षा गुजराती नेहा जगताप स्मिता पाटील
उपस्थित होत्या.