भुसावळात राममंदिर वार्डात आज हिंदू संमेलनाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी) – सनातन हिंदू धर्माच्या परंपरांचे जतन, समाजात एकात्मता वाढवणे तसेच संस्कार आणि सामाजिक समरसता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भुसावळ शहरात आज (मंगळवार, दि. २१) हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ७ वाजता राम मंदिर वॉर्डातील माहेश्वरी भवनजवळ हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात शिंदखेडा येथील गुरु गोरक्षनाथ आखाड्याचे योगी दत्तनाथ महाराज मार्गदर्शन करणार असून, प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे सहकार्यवाह डॉ. रमेश जाधव उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाला शहरातील सकल हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.