भुसावळ येथे प्रणिता प्रतिष्ठानतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा भव्य कार्यक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रणिता प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.१४ वाजता संगीतबद्ध सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शारदा नगर येथील एन. के. नारखेडे शाळेसमोरील मैदानावर होणार असून, यावेळी ह.भ.प. श्री. भरत महाराज (श्री क्षेत्र कुंडलेश्वर, बेळी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात रामायणावर आधारित भव्य वेषभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले असून, स्पर्धेसाठी इच्छुकांनी नावनोंदणी करण्यासाठी 7798798652 किंवा 9049252318 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यावेळी महाआरती पोलीस उपअधीक्षक,श्री. केदार बारबोले का, श्री. मनोजभाऊ बियाणी (उद्योजक) तसेच श्री. मधुभाऊ महाजन अध्यक्ष, श्री गुरुदत्त बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्या हस्ते पार पडली पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रणिता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.