भुसावळ (प्रतिनिधी ) नागपूर विभागातील गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या कामामुळे एप्रिल २०२६ मध्ये काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील ‘वॉशेबल ॲप्रन’चे ‘बॅलस्टेड ट्रॅक’मध्ये रूपांतर करण्यासाठी ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, शालिमार आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या एकूण चार गाड्यांच्या सेवांवर याचा परिणाम होणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे:
ट्रेन क्र. 18030 (शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस):
४ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान शालिमारहून सुटणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द.
ट्रेन क्र. 18029 (लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्सप्रेस):
६ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द.
ट्रेन क्र. 12101 (लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्सप्रेस):
४, ६, ७, १०, ११, १३, १४, १७, १८, २० आणि २१ एप्रिल २०२६ रोजीच्या फेऱ्या रद्द.
ट्रेन क्र. 12102 (शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस):
६, ८, ९, १२, १३, १५, १६, १९, २०, २२ आणि २३ एप्रिल २०२६ रोजीच्या फेऱ्या रद्द.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या बदलांची नोंद घेऊन त्यांनी आपला प्रवास नियोजित करावा.


