जळगाव (प्रतिनिधी ) :

जळगावातील 31 वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पीडित महिला ही जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी असून शुक्रवार, 13 मार्चच्या रात्री 11.30 ते 14 मार्चच्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडितेचे नातेवाईक असलेल्या दोन आरोपींनी तिला एका भागातील घरात गाठले. यावेळी आरोपी राजेश शिवराम पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पाजले. त्यानंतर शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असताना राजेश पवार आणि आरोपी राजेंद्र शंकरसिंह पवार या दोघांनी पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.


