भुसावळ येथे जीएनआरएफ कडून रमजाननिमित्त रेशन किटचे वितरण

भुसावळ (प्रतिनिधी)-
दावते इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त गरजू कुटुंबांसाठी रेशन किट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत भुसावळ शहरातील १०० हून अधिक गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. त्यामध्ये तांदूळ, गहू पीठ, डाळ, साखर, चहा, खजूर, मसाले आदी वस्तूंचा समावेश असून रमजान महिन्यात कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दावते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे व स्वयंसेवकांचे आभार मानले. तसेच संस्था पुढील काळातही अशाच प्रकारे मानवसेवा करत राहील, असे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीएनआरएफ जळगाव जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी, शहराध्यक्ष शोएब अत्तारी, अब्दुल सईद, साबिर मनियार, युसुफ खान, अझहर कादरी, जहांगीर शेख आणि हाफिज कासिम यांनी विशेष परिश्रम घेतले.