भुसावळ (प्रतिनिधी ) –

पालिकेच्या सोमवारी विशेष सभेत ३७२ कोटी ३५ लाख ९४ हजार ६१४ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. दुपारी चार ते साडेपाच दरम्यानच्या सभेत दीड तास विविध विषयांवर चर्चा झाली. भाजपचे नगरसेवक गिरीश महाजन यांनी अर्थसंकल्पातील त्रुटी व चुका समोर आणल्या, तर नगरसेवक निर्मल कोठारी यांनी वीजबिल, बायोमायनिंग यावरील तरतुदीचा प्रश्न मांडले. कोणतीही करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाला चर्चेअंती मंजुरी मिळाली.
पालिकेच्या छत्रपती सभागृहात नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रक मंजुरीसाठी विशेष सभा झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, लेखापाल अयुब तडवी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत अंदाजपत्रकातील चुका लक्षात आणून देवूनही अधिकाऱ्यांनी त्या सुधारल्या नाहीत, या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

३५ लाख ५८ हजार ४६१ रुपये शिलकी व कोणतीही करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. दरम्यान, विशेष सभेत अंदाजपत्रक व तरतुदींच्या व्यतिरिक्त इतरही मुद्दे समोर बंदोबस्त, दिवसा सुरू असणारे पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, रेल्वे पालिकेच्या महावितरणकडून मीटर बसवून नुकसान टाळावे. ते मीटर देत नसतील तर दरमहा वीज बिल भरु नये, असे सूचीत केले. पालिकेकडून कचऱ्याचे बायोमायनिंग होत नसल्याने ११ कोटींची तरतूद कमी करावी, हा मुद्दा देखील मांडला
वीजबिल, बायोमायनिंगचा मुद्दाही सभेत गाजला. नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पालिकेने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून जलशुद्धीकरण केंद्रात सोलर यंत्रणा उभारली. पण, महावितरणकडून मीटर मिळत नसल्याने दरमहा किमान २१ ते २२ लाखांचे बिल भरावे लागते.

महावितरणकडून मीटर बसवून नुकसान टाळावे. ते मीटर देत नसतील तर दरमहा वीज बिल भरु नये, असे सूचीत केले. पालिकेकडून कचऱ्याचे बायोमायनिंग होत नसल्याने ११ कोटींची तरतूद कमी करावी, हा मुद्दा देखील मांडला.
डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकत असल्याने कर घेणे, दहा ते बारा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा या मुद्द्यांचा चर्चा झाली.
अमृत टप्पा २ ची चौकशी करा : चौधरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिन चौधरी म्हणाले, अमृत टप्पा दोन या कामासाठी ठेकेदाराला ४९ कोटी रुपये अदा केले आहेत. मात्र, ठेकेदाराला जेवढी रक्कम अदा झाली आहे, तेवढे काम झाले आहे का? याची चौकशी व्हावी. अमृत टप्पा दोनच्या कामांना गती दिली जाण्यासाठी यापूर्वी अदा झालेल्या बिलांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. आगामी काळात या कामांकडे लक्ष ठेवण्याचा मुद्दा चौधरींनी मांडला.
नगरसेवक गिरीश महाजन यांनी अंदाजपत्रकात सन २०२४ – २५ मध्ये अमृत योजना टप्पा एकवर ४ कोटी ९० लाख, तर २०२५-२६ मध्ये १९ कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद केले आहे. ही आकडेवारी चुकीची आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी व अधिकाऱ्यांनी काय पाहून बजेटवर स्वाक्षऱ्या केल्या? अशी विचारणा केली. यावर गोलमाल उत्तर मिळाले.
अर्थसंकल्पाला यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यानंतर सोमवारी विशेष सभेत मंजुरी मिळाली. आता अर्थसंकल्प अवलोकन व अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर तरतुदीप्रमाणे पालिकेला विविध विषयांवर विकासात्मक कामे करता येतील.
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्वीकृत सदस्य संतोष चौधरी, उल्हास पगारे, भाजपचे गट नेते युवराज लोणारी, उपाध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेविका शोभा इंगळे, नगरसेविका प्राची पाटील यांनी अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेत विविध मुद्दे मांडले .



