भुसावळ (प्रतिनिधी : दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने खडका येथील ज्ञानज्योती मराठी माध्यमिक विद्यालय येथे विधी जनजागृती कार्यक्रम पार पडला

या कार्यक्रमात “शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, 2012 (POCSO)”, समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनीयता, तसेच बालिकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी उपाययोजना या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.भुसावळ तालुका विधी सेवा समांतर सहाय्यक (PLV) सौ. संगीता भामरे यांनी विधी सेवा समिती माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य यू. पी. बाविस्कर यांनी प्रस्ताविक केले. इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंतचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिटेनर वकील अॅड. सौ. मनीषा मॅडम यांनी POCSO कायद्यांतर्गत तरतुदी, 2012 च्या कायद्याची माहिती, तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कायद्याचा योग्य वापर केल्यास पीडितांना न्याय कसा मिळू शकतो, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
महिलांची सुरक्षितता, बालकांवरील वाढते अत्याचार, तसेच समाजातील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज यावरही विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करावा, पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, कुणीही अनुचित वर्तन केल्यास त्वरित शिक्षक व पालकांना माहिती द्यावी, अत्याचार सहन न करता पोलिसांत तक्रार करावी, कायदा व पोलीस प्रशासन मदतीसाठी सदैव तत्पर असते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान न्यायालयाच्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. शेवटी सौ. संगीता भामरे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमास प्राचार्य श्री. यू. पी. बाविस्कर तसेच श्री. ए. एम. फेगडे, श्री. एस. डी. सरोदे, सौ. आर. एस. अबलकर, श्री. डी. आर. धांडे, श्री. पी. के. लोहार, सौ. एन. एस. भिरूड, सौ. एस. डी. भोळे, श्री. एस. आर. ठोसरे, श्री. पी. पी. भोळे, श्री. व्ही. व्ही. शिंदे, श्री. जे. पी. कांबळे, सौ. आश्विनी हर्षल सरोदे, सौ. पी. यू. फेगडे, सौ. एम. डी. पाटील, सौ. सी. डी. धांडे, श्री. मयूर अनिल भोळे, श्री. देवेंद्र वेडू सरोदे, श्री. दत्तात्रय गोपाळ भोळे, श्री. काशिनाथ गंभीर सोनावणे, सौ. सविता भरत भोळे, श्री. पराग अरुण महाजन, श्री. दर्शन दत्तात्रय भोळे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
खडका गाव, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे झालेला हा विधी जनजागृती कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.


