भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव – भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा पंचायतच्या वतीने सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मनोगतात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक श्री. ललितदादा पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच आमदार श्री. सुरेश (राजुमामा) भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार श्री. शिरीष चौधरी, जळगाव महापौर सौ. दीपमाला काळे, प्रा. पी. आर. चौधरी, श्री. संजयदादा राणे तसेच श्री. विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.