उधना–मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडी सोबतच राजकोट–महबूबनगर साप्ताहिक गाडी फेऱ्यांमध्ये विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी ) होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने दोन विशेष गाड्यांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उधना–मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यासोबतच राजकोट–महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्येही विस्तार करण्यात आला आहे.

उधना – मालदा टाउन साप्ताहिक विशेष (08 फेऱ्या)

गाडी क्रमांक 03418 (उधना – मालदा टाउन)
दिनांक 02 मार्च 2026 ते 23 मार्च 2026 दरम्यान प्रत्येक सोमवारी उधना येथून दुपारी 12:30 वाजता सुटेल व बुधवारी सकाळी 05:55 वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 03417 (मालदा टाउन – उधना)
दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ते 21 मार्च 2026 दरम्यान प्रत्येक शनिवारी मालदा टाउन येथून दुपारी 12:15 वाजता सुटेल व सोमवारी पहाटे 02:15 वाजता उधना येथे पोहोचेल.

महत्त्वाचे थांबे:
चलथान, व्यारा, नवापुर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावल, इटारसी, पिपरिया, मदन महल, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय, सासाराम, गया, तिलैया, नवादा, शेखपुरा, किऊल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बरहरवा आणि न्यू फरक्का.

डबे संरचना:
एसी 3-टियर, स्लीपर वर्ग व जनरल सेकंड क्लास.

राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार

गाडी क्रमांक 09575 (राजकोट – महबूबनगर)
प्रति सोमवार धावणारी ही गाडी दिनांक 02 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 09576 (महबूबनगर – राजकोट)
प्रति मंगळवार धावणारी ही गाडी दिनांक 03 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.

या गाडीच्या वेळापत्रकात व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी RailOne ॲपचा वापर करावा. विशेष गाड्यांच्या थांब्यांचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.