भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या वतीने शहरात प्रथमच दोन दिवसीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २१ व रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम रेल्वे स्टेशनजवळील कृष्णचंद्र सभागृह येथे संपन्न होणार आहे.

या धम्म परिषदेस अध्यक्ष म्हणून पूज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना उपस्थित राहणार आहेत. त्या बोधिपक्खिय धम्म फाउंडेशनच्या संस्थापक असून आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅटिंग सेरेमनी, बोधगया यांच्या कोषाध्यक्ष आहेत. तसेच त्या अभिधम्मपिटक अभ्यासिका व शिक्षिका असून गोल्ड मेडलिस्ट आहेत.
दोन दिवसीय या धम्म परिषदेत विशेष धम्मदेशनेसाठी पूज्य नागकन्या थेरी अय्याजी, पूज्य विनयशिला थेरी अय्याजी, पूज्य उप्पलवना थेरी अय्याजी, पूज्य सुजाता थेरी अय्याजी, पूज्य श्रामणेरी रुपासरी तसेच पूज्य कुंडलकेशा अय्याजी यांच्या भिक्खुणी संघाचे प्रवचन लाभणार आहे.
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमराव साळुंके, सुरेश पहेलवान, यशोदे, सुरेंद्र रामटेके, सुधाकर सोनवणे, अशोक शिंदे, दीपक नन्नवरे, विशाल सोयंके, राहुल कुचेकर, संदेश शिंदे, गजानन निंबाळकर, महेश सपकाळे, पत्रकार सुनील आराक, सचिन गायकवाड, धम्मिका इंगळे, अजय इंगळे यांसह समाज बांधव परिश्रम घेत आहेत.


