नवी दिल्ली ;-

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बीबीसी स्पोर्ट्स वूमन ऑफ दि इयर 2025 अवॉर्डपुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून भारतातील महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. या सोहळ्यात विविध क्रीडा प्रकारांतील उत्कृष्ट महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी दिल्यास देश अधिक उंची गाठतो. आज भारतीय महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.” महिला क्रीडा सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण, क्रीडा विकास, ASMITA लीग आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 यांसारख्या उपक्रमांद्वारे अधिक पारदर्शक, सक्षम आणि सर्वसमावेशक क्रीडा व्यवस्था उभारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास खासदार राजीव शुक्ला, रंजीत रंजन, राजीव राय, राहुल कसवान, तसेच Jonathan Munro (CEO, BBC News), रूपा झा (CEO, Collective Newsroom), दिलीप तिर्की, लिएंडर पेस, अंजू बॉबी जॉर्ज, दीपा मलिक आणि योगेश्वर दत्त यांच्यासह देशभरातील आघाडीचे खेळाडू, क्रीडा प्रशासक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करत असताना, क्रीडा क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, आत्मविश्वास आणि यश हे राष्ट्रीय अभिमान व प्रगतीसाठी प्रभावी प्रेरणाशक्ती ठरेल, असा विश्वास रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.



