जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त कार्यक्रम :

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे दिनांक २० फेब्रुवारी २६ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता , मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या आवाहनानुसार स्व. पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय बापू पाटील हे असतील.
पमहनीय वक्ते श्री डॉ. दिलीप तिवारी , ज्येष्ठ पत्रकार व डॉ राजेश राजोरे सर, ज्येष्ठ पत्रकार देशोन्नती.
प्रमुख पाहुणे श्री संदीप घोरपडे अंमळनेर, डॉ. प्रा. नारायण खडके सर जळगाव, श्री रवींद्र ठाकुर जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव , श्री अशोक भाऊ जैन अध्यक्ष जैन उद्योग समुह, डॉ. सुधीर भटकर सर जळगाव . हे उपस्थित असतील.
सदर कार्यक्रमात पत्रकारितेत डॉक्टरेट पदवी मिळविलेले ज्येष्ठ पत्रकार यांचा सत्कार, सन्मान आयोजित करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील तमाम पत्रकार बंधु भगिनींना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा पत्रकार संघ पदाधिकारी व जिल्हा संघटक, तालुका पत्रकार संघ अध्यक्ष यांनी केले आहे.