राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आले आहे बारामतीतल्या त्यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते उपचारासाठी पुणे कडे निघाले आहेत. एकीकडे राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाची लगबग सुरू आहे तर दुसरी कडे शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाही दोन ते तीन महिन्यांपासून ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेले देखील नाही, परंतु दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर शरद पवार हे पुन्हा जनतेसमोर आले भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली, आणि गेल्या आठवड्यातील तीन दिवस ते अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी मधील निवासस्थानी होते. दरम्यान मागील आठवड्यात शरद पवार यांची प्रचंड दगदग झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दुपारी कार्ड ॲम्बुलन्स ने शरद पवार हे उपचारासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत पुण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


