नगरपालिका सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावावी – मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)-
हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भुसावळ नगरपालिका सभागृहात लावण्यात यावी, या मागणीसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने सर्व पक्षीय बाळासाहेब प्रेमी भुसावळकरांनी मुख्याधिकारी , नगराध्यक्षा , सर्व गटनेते तसेच भुसावळ नगरीचे शिल्पकार व माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांना निवेदन दिले

यावेळी कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा), प्रा. उत्तमराव सुरवाडे सर, दीपक धांडे, मुकेश गुंजाळ, ललित मुथा, गणेश सोनवणे, शेख मकबूल, दिलीप सुरवाडे, राजू इंगळे, दीपक सोनवणे, राकेश खरारे, अरुण साळुखे, करण खरारे, मिलिंद कापडे, धीरज वार्डोनकर आदी बाळासाहेब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुसावळ शहर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असून त्यांच्या आशिर्वादाने भुसावळ तालुक्यात अनेक आमदार, खासदार, नगराध्यक्ष व नगरसेवक घडले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचे अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बाळासाहेबांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला तो नेता झाला, अशा असंख्य नेत्यांचा आज महाराष्ट्रात वावर आहे. त्यामुळे अशा महानायकाची प्रतिमा नगरपालिका सभागृहात लावल्यास येणाऱ्या पिढीला प्रेरणा व आदर्श मिळेल, असे मनोगत यावेळी उमाकांत शर्मा यांनी व्यक्त केले.