ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली ::

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्या निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. महात्मा गांधी हे भारतीय वकील, राजकारणी, समाजसुधारक आणि लेखक होते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले, म्हणूनच त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवण्यात आले.

यावेळी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनीही महात्मा गांधी यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख कयूम यांनी केले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रिंसीपल निना कटलर सोबत विद्यार्थी.