बियाणी पब्लिक स्कूलमध्ये ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ. संगिता बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, रोणक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी, राजीव पारिक, प्रवीण भराडिया तसेच शाळेचे प्राचार्य रुद्रसेन गंठिया उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त व जबाबदारीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.