सुधाकरसेठ सराफ स्मृती निमित्त भुसावळला उद्या मंगला खाडीलकर यांचा ‘मनोमनी’ हा एकपात्री प्रयोग

भुसावळ, (प्रतिनिधी ): येथील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक स्व. सुधाकरसेठ सराफ यांच्या स्मृती निमित्त मंगळवारी (ता. २७) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुंबई येथील प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांचा  'मनोमनी' हा एकपात्री प्रयोग होणार आहे.
मंगला खाडिलकर गेली ३६ वर्षांपासून निवेदन क्षेत्रात कार्यरत आहेत. निवेदन, सूत्रसंचालन, निरूपण, मुलाखती, कथाकथन व समालोचन अशा  सर्व क्षेत्रात त्यांनी आपला  वेगळा ठसा उमटवला आहे.  त्यांच्या चौफेर कर्तृत्वाबद्दल रसिकांचा 'सुसंवादिनी'  हा उत्स्फूर्त किताब त्यांना लाभला आहे.  या व्यतिरिक्त अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
खाडीलकर यांच्या आरसा या देश विदेशात गाजलेल्या व दोन हजार प्रयोगांचा टप्पा पार केलेल्या रसिकप्रिय कार्यक्रमाचे पुढचे पाऊल म्हणजे 'मनोमनी' होय. यात संवाद मनातला, जनातला, कथा,कविता ,किस्से,आठवणी यांची मनोज्ञ ,खुसखुशीत एकपात्री सादरीकरण असते.
डॉ सुषमा खानापुरकर या अध्यक्षस्थानी असतील. गायत्री शक्तीपीठा जवळील सुशीलाबाई फालक शाळेच्या मैदानावर संध्याकाळी पाच वाजुन ४५ मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होईल. तरी कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुधाकर यशवंत सराफ फर्मचे प्रमुख उज्वल सराफ यांनी केले आहे.