जळगाव (प्रतिनिधी)-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे....या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित सुरज वानखेडे याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


