भुसावळ (प्रतिनिधी) –
येथील मातृभूमी चौकातील सुराणा साधना भवनात महाराष्ट्र गौरव, खानदेश केसरी, म.सा. बरसादाता गौतम मुनिजी महाराज तसेच युवा प्रज्ञ, प.पू. चेतन मुनिजी महाराज यांचे प्रवचन मंगळवार दिनांक २७ पासून सुरू झाले आहे.
दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी ३ ते ४ या वेळेत धार्मिक चर्चा होणार आहे. तसेच रात्री ८ ते ९ या वेळेत युवा वर्गासाठी विशेष मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघपती जयंतीला सुराणा, जे. बी. कोटेचा, गौतम चोरडिया, कांतीलाल चोरडिया व अतुल ताथेड यांनी केले आहे.



