भुसावळ (प्रतिनिधी ) दीपनगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.१० वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष डगळे (उपमुख्य अभियंता, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रीती रामटेके (कल्याण अधिकारी, औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर) उपस्थित होत्या.
विशेष उपस्थितीमध्ये . शैलेंद्र सपकाळे (सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दीपनगर) महेंद्र सपकाळे सर, निलेश नेहेते सर, सौ. रुपाली राणे मॅडम (शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय, दीपनगर), तसेच श्री. सुनील पवार (निवृत्त शिक्षक) यांचा समावेश होता.
कार्यक्रमास विविध संघटनांचे पदाधिकारी श्री. रोशन वाघ, श्रीराम फड, सचिन भावसार, स्वप्निल पाटील, अशोक पाटील, अजय साळुंखे, छगन पवार, वर्षा तायडे, जोशना मोरे, विद्या कोळी, दीपनगर येथील अंगणवाडी सेविका, केंद्राचे सभासद कामगार बंधू-भगिनी तसेच शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय, दीपनगर येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोरकुमार मनोहर पाटील (केंद्र संचालक, कामगार कल्याण केंद्र, दीपनगर) यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. ललित माळी व सौ. शारदा भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशा प्रकारे कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.



