ग्रुप ग्रामपंचायत निंभोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) – निंभोरा बुद्रुक (दीपनगर) : भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे ग्रुप ग्रामपंचायत पिप्रीसेकम व निंभोरा यांच्या संयुक्त वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सरपंच रोहिणी कोलते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जोशी यांनी केले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य उल्हास बोरोले, यासिन पठाण, सनी चाहेल, दिलीप बऱ्हाटे, विजय मालवीय तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रकाश सरदार, एन. टी. इंगळे, प्रभाकर साळवे, सी. एम. यावलकर, गजू तायडे, राजेश लोंढे, भूषण दुसाने आदींचा समावेश होता.

यावेळी मुख्याध्यापिका माधुरी लोंढे, कल्पना प्रधान, दिपाली जंजाळ, उमा मटकरी आदी शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

संस्कार प्री-स्कूल तसेच जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता १ ते ४ मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप कल्पना प्रधान यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.