जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष उत्तम वानखडे व महासचिव प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेचा नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच मुख्यमंत्री यांनी तो राजीनामा त्वरीत स्वीकारावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, जिल्हा महासचिव सुमित सोनवणे तसेच जळगाव महानगरपालिका अध्यक्ष प्राजक्ता तायडे उपस्थित होत्या.


