भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ–साकेगाव येथील ट्रामा सेंटरला ‘शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकात सुरवाडे यांनी नमूद केले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा या तालुक्याशी स्नेहसंबंध व जनसंपर्क राहिलेला असून, त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी या ट्रामा सेंटरला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल.
या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित वैद्यकीय व प्रशासकीय विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही सुरवाडे यांनी केले आहे.


