भुसावळात आर्या फाउंडेशन व हिरकणी महिला मंचतर्फे २३ रोजी हळदी-कुंकू समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये हिमोग्राम (Heamogram) व थायरॉईड (Thyroid) तपासणी मोफत करण्यात येणार आहे. सदर आरोग्य शिबिर श्री वेंकटेश बालाजी कम्प्युटर आईज लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

हा कार्यक्रम अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री व्यंकटेश बालाजी मंदिरासमोर, टिंबर मार्केट, भुसावळ येथे संपन्न होणार आहे.

रूढी परंपरेनुसार हळदी-कुंकू, फुलांची ओटी व आनंदी क्षणांसोबत महिलांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी 7559331710 / 9665666713 / 8999188699 संपर्क साधावा .