मुंबई -| प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई–नागपूर मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त प्रवासी मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही विशेष सेवा सुरू करण्यात येत आहे.

गाडी क्रमांक 02139 ही विशेष गाडी दि. 25 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून रात्री 00.20 वाजता सुटणार असून, ती त्याच दिवशी दुपारी 15.30 वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक 02140 ही विशेष गाडी दि. 25 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथून रात्री 20.00 वाजता सुटून पुढील दिवशी दुपारी 13.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
या विशेष गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे असणार आहेत. गाडीची संरचना पुढीलप्रमाणे असेल १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी,
६ वातानुकूलित तृतीय श्रेणी,
९ शयनयान डबे,
४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे,
१ सामान्य द्वितीय सह गार्ड ब्रेक व्हॅन
आणि १ जनरेटर कार.
आरक्षणाची सुविधा विशेष गाडी क्रमांक 02139 व 02140 साठी दि. 23 जानेवारी 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
मध्य रेल्वेच्या या विशेष गाडीमुळे मुंबई–नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


