श्री राम मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील लक्ष्मी माता चौकाजवळील पुरातन श्री राम मंदिरात दि. २२ रोजी श्री गणेश जयंती व विनायक चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी पूजन, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

मंदिराच्या अध्यक्षा सरिता चौक यांच्या उपस्थितीत अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. यावेळी अथर्वशीर्षाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व उपस्थित भाविकांना सांगण्यात आले.

कार्यक्रमास राधेश्याम लाहोटी, जे. बी. कोटेचा, रामवल्लभ झवर, सत्यनारायण शर्मा, गोपाल चांडक, विनोद शर्मा, वसंत नाईक, राम गजके, दिलीप लोंढे, सुभाष शिरसाळे, प्रशांत भोंडे, राजू गुरव, प्रशांत बजाज, अनुप अग्रवाल, विमल कोटेचा, अरुणा अग्रवाल, धनश्री जोशी, विशाखा नाईक, कविता नाईक, मनीषा इखे, रूपाली महाजन, स्मिता दुसाने, निर्मला चौधरी, मंगला कुलकर्णी, मेघा कुरकुरे, वर्षा लोखंडे, सविता चौक, लक्ष्मी पाटील, भारती पाटील, मालती पाटील यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव व आनंदी वातावरणात पार पडला.