भुसावळ (प्रतिनिधी) – येथील गणेश गल्ली, राम मंदिर वार्ड येथील विघ्नहर्ता श्री गणेश जयंतीनिमित्त अलंकार सार्वजनिक मंडळ, भुसावळ यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता महाआरती संपन्न होणार असून त्यानंतर सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विघ्नहर्त्याचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अलंकार सार्वजनिक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


