भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सव साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त उत्साहात पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने पतंग उडवण्याचा आनंद घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या हस्ते पतंग उडवून करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सणांची परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या महोत्सवात विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदानेही उत्स्फूर्त सहभाग घेतला. संक्रांतीच्या शुभेच्छा देत सर्वांनी हा सण आनंदात साजरा केला.