जळगावात बाेगस मतदाराला बदडले, पिंप्राळ्यात गाेळीबार झाल्याची चर्चा : महापालिका रणसंग्राम : दुपारी दीड वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान

जळगाव – जळगाव महापालिकेसाठी प्रचंड चुरशीत मतदान सुरू आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवाराने बाेगस मतदाराच्या कमरेत लाथा घातल्या. तर निवडणुकीचा हाॅट स्पाॅट असलेल्या पिंप्राळ्यात गाेळीबार झाल्याची चर्चा आहे. उपमहापाैर कुलभूषण पाटील यांच्या घराजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येते आहे. पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दुापरी दीड वाजेपर्यत शहरात २२.४९ टक्के मतदान झाले.
जळगावात महापालिका निवडणुकीत कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे. सर्वाधिक हाॅट प्रभाग म्हणून क्रमांक पाच ओळखला जाताे आहे. या ठिकाणी माजी महापाैर विष्णू भंगाळे हे शिवसेनेचे तर त्यांच्या विराेधात नरेंद्र भास्कर पाटील यांचे सुपूत्र पीयूष पाटी हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी माेठे आव्हान भंगाळे यांच्यासमाेर उभे केले आहे. याच प्रभागात चाळीसगाव तालुक्यातील ४० ते ४५ बाेगस मतदार आणले असल्याचा आराेप करण्यात आला. त्यात एक मतदार हा मतदान केंद्रात आला असता ताे पुरेसे पुरावे दाखवू शकला नाही. त्यामुळे पीयूष पाटील यांनी त्याला चाेप दिला. पाेलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला. पिंप्राळ्यात माजी नगरसेवक आबा कापसे यांच्या निवासस्थानासमाेर सकाळी दहा वाजता माेठा फाैजफाटा तैनात करण्यात आला हाेता. या ठिकाणी त्यांचे सुपूत्र तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे मयूर कापसे आणि महायुतीत काट्याची लढत आहे. याच प्रभागात दुपारी अडीच वाजता गाेळीबार झाल्याची चर्चा आहे.

प्रभाग १८मध्ये बाेगस मतदानाची तक्रार
बाेगस मतदान : प्रभाग क्रमांक १८मध्ये सुप्रीम काॅलनी परिसरात पहूर, फर्दापूर, अजिंठा भागातून बाेगस मतदार आणण्यात आल्याचा आराेप महाराष्ट्र नवनिर्माण सनेने केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले. निवेदनावर विभागीय अध्यक्ष उमेश अठरे, विशाल जाधव, श्रीकृष्ण मेंगडेंच्या सह्या आहेत