भुसावळ (प्रतिनिधी ) – आज मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संक्रांत निमित्त लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते सचिन संतोषभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवकांसोबत पतंग उडवत सण साजरा करण्यात आला.

या प्रसंगी धीरज अनिलभाऊ चौधरी, चेतनभाऊ भंगाळे, दुर्गेशभाऊ ठाकूर तसेच समस्त युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्वांनी एकत्र येत पतंग उडवण्याचा आनंद घेत आपुलकीने सण साजरा केला.
मकर संक्रांती हा सण सामाजिक ऐक्य, उत्साह आणि नवचैतन्य देणारा असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. युवकांचा सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


