भुसावळ( प्रतिनिधी ) –
येथील ब्राह्मण संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे.

सामूहिक व्रतबंध सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत होईल. या कालावधीत व्रतबंधाचे सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडले जाणार आहेत.
या सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाजबांधवांनी दि. 15 जानेवारी 2026 पर्यंत व्रतबंधासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे. नावनोंदणीसाठी ब्राह्मण संघ कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


