अजिंठा कला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन :

फर्दापूर, (प्रतिनिधी)
अजिंठा आर्ट सोसायटी, जळगाव यांच्या वतीने आयोजित अजिंठा कला महोत्सव उद्घाटन यु. यु. पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. दीपप्रज्वलन भरत गडरी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागरमल जैन होते.

प्रमुख पाहुणे म्हणून भैय्यासाहेब स्नेहदिप गरुड, विलास धनसिंग राजपूत, डॉ. किरण सूर्यवंशी, ए. ए. पटेल, स्नेहल पाटील, पी. पी. साबळे (सहायक पोलीस निरीक्षक, फर्दापूर) तसेच आर. एस. चौधरी (मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शेंदुर्णी) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्ही. आर. पाटील (मुख्याध्यापक, पळासखेडे), एस. के. पाटील (मुख्याध्यापक, नांद्रा), एस. टी. चिचोले (मुख्याध्यापक, वाकोद), फिरोज पठाण (उपसरपंच, फर्दापूर), शेख झाकीर (माजी सरपंच, फर्दापूर) व दिलीप तासखेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रास्ताविक शिवप्रसाद जोशी यांनी केले. उद्घाटक यु. यु. पाटील यांनी महोत्सवाचे कौतुक करत कला चळवळीला चालना मिळत असल्याचे सांगितले. भरत गडरी यांनी ग्रामीण भागात कलेचा अधिक प्रसार व्हावा व चित्रकलेची लहान-मोठी प्रदर्शने आयोजित व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात सागरमल जैन यांनी शाळांमध्ये चित्रकला प्रदर्शनांचे आयोजन आवश्यक असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन टी. टी. इंगळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन एस. टी. चिचोले यांनी केले.

जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी महोत्सवास भेट देत सांगितले की, “अजिंठा कला महोत्सव केवळ चित्रकारांनाच प्रभावित करत नाही, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही करीत आहे.”

या महोत्सवात ४० प्रतिनिधींनी सहभाग घेतला असून, प्रत्येकाची चित्राकृती आकर्षक ठरत आहे. विशेषतः अजिंठा लेणीतील ‘ब्लॅक ब्युटी’ या चित्राची साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.