बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये दि. १० जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील तब्बल १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ. संगीता बियाणीपियुष बियाणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेदरम्यान सुरक्षितता व वाहतूक नियंत्रणासाठी भुसावळ वाहतूक शाखेचे संजय भदाणे, अजय पाटील, स्मिता अहिरे तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे भाऊसाहेब पाटील, हेमंत जंगले यांनी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार स्पर्धेचे विविध गट करण्यात आले होते. पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी-सहावी, सातवी-आठवी, नववी-बारावी तसेच मुलींसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आले. मोठ्या गटासाठी ८ किलोमीटर तर लहान गटासाठी ५ किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते.

विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम गट (लहान गट)
मुली : प्रथम – मानवी धनगर, द्वितीय – स्नेहल बारेला, तृतीय – आरोही तडवी
मुले : प्रथम – साई प्रवीण कचरे, द्वितीय – कल्पेश पाटील, तृतीय – कुणाल आवार

द्वितीय गट
मुली : प्रथम – निशा बारेला, द्वितीय – योगेश्री पावरा, तृतीय – रवीना पावरा
मुले : प्रथम – पियुष धनगर, द्वितीय – दुर्गेश दागोडे, तृतीय – हर्ष कणखरे

तृतीय गट
मुली : प्रथम – जानवी गावित, द्वितीय – आरोही गावित, तृतीय – मनस्वी वसावे
मुले : प्रथम – कृष्णा धनगर, द्वितीय – सोहम रंजीत भोळे, तृतीय – साईश सतीश मांगले

चतुर्थ गट (१२ वर्षांखालील)
मुली : प्रथम – ज्ञानेश्वरी पाटील, द्वितीय – वैष्णवी धनगर, तृतीय – दिव्यानी पाटील
मुले : प्रथम – रुद्र राठोड, द्वितीय – ओम बोरसे, तृतीय – खुशाल सावळे

पाचवा गट (१४ वर्षांखालील)
मुली : प्रथम – दिव्या बारेला, द्वितीय – लक्ष्मी बारेला, तृतीय – अश्विनी बारेला
मुले : प्रथम – चिंतामण हाके, द्वितीय – नचिकेत बोंडे, तृतीय – प्रथमेश गोपाल परदेशी

सहावा गट (१६ वर्षांखालील – मुले)
प्रथम – योगेश कोलेकर, द्वितीय – दानिश तडवी, तृतीय – सविन बारेला

स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सर्व विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पदके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील, पर्यवेक्षक रवींद्र तायडे, निवृत्ती पाटील, क्रीडा शिक्षक एच. एन. पाटील, दिलीप संगेले, युसुफ खान, तुषार सैतवाल, सैनिकी प्रशिक्षक सुधीर पाटील, समाधान सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.