व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगच्या वसई जिल्हा अध्यक्षपदी सौ. सोनल महाडिक यांची निवड :

भुसावळ – जागरूक वसई वृत्तपत्र आणि जागरूक वसई न्यूज चॅनलच्या संपादिका सौ. सोनल प्रसाद महाडिक यांची व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगच्या वसई जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सौ. सोनल महाडिक या मागील वीस वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून, गेल्या पाच वर्षांपासून त्या जागरूक वसई वृत्तपत्राच्या संपादिका म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर, महासचिव दिव्या भोसले यांच्यासह महिला विंगच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांनी सौ. सोनल महाडिक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडीमुळे महिला पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळेल तसेच संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.