भुसावळ (प्रतिनिधी ) –
वीर गुजर सेना या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. संघटनेच्या वतीने संबंधित कार्यकर्त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

या वेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष हेसंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण पाटील यांच्या उपस्थितीत प्रमोद जगन्नाथ पाटील यांची भुसावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन हा नियुक्ती सोहळा पार पडला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आजवर केलेले समाजकार्य कौतुकास्पद असून, पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून समाज संघटन, युवक मार्गदर्शन तसेच सामाजिक प्रयूश्नांवर ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
संघटनेच्या निवेदनानुसार, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ दि. 26 जून 2030 पर्यंत राहणार आहे.


