शेगाव येथे ‘मूक नायक पत्रकार वर्धापन दिना’निमित्त नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे हे होते.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत किरण उपाध्याय तसेच राज्य संघटक पदमा मोहड यांची उपस्थिती होती.

बैठकीची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. देशातील पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला.

या बैठकीस राज्यभरातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. त्यामध्ये रवि शेगोकार, जसवंत बहादुरे, कैलास खराटे, जफर खान, नागेश भटकर, अनिल खराटे, डॉ. कपिल मुन, गौतम इंगळे, संजय इंगळे, जुगल सावळे, भीमकिरण दामोदर, विजय टेंभुर्णे, पंकज मुनेश्वर, अमीन शेख, अनिल सवादेकर यांच्यासह अनेक पत्रकारांचा समावेश होता.

बैठक यशस्वी करण्यासाठी शेगाव शहर व तालुका कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी रवि शेगोकार यांनी उपस्थितांचे आभार मानले.