साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) –
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयाचे सचिव राजेश पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी क्षण उपस्थितांना सांगितले. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमास वाचनालयाचे कोषाध्यक्ष अरुण शिंदे, संचालक प्रवीण तायडे, ग्रंथपाल सौ. कविता पाटील तसेच शिपाई प्रवीण बोदडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.