बियाणी पब्लिक स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये दिनांक २ रोजी वार्षिक स्पोर्ट्स डे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शंतनू साहू उपस्थित होते.

यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ. संगिता बियाणी, स्मिता बियाणी, आयुषी बियाणी, राजेश पारीख, प्रविण भराडिया, प्राचार्य रुद्रसेन गंठिया, डी. एम. पाटील, कांचन जोशी, सुशील नारखेडे, आकाश इंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात स्पोर्ट्स ध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलन व आकाशात फुगे सोडून मान्यवरांच्या हस्ते स्पोर्ट्स डेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. शंतनू साहू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते तसेच प्रतिकारशक्ती वाढते. “खेळोगे तो बढोगे” या उक्तीचा त्यांनी उल्लेख केला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट, ड्रिल तसेच विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. शंभर मीटर धावणे, बेडूक उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक अशा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीना खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य रुद्रसेन गंठिया यांनी मानले.